संजय क्रिकेट अकादमी संघाची आगेकूच

जस क्रिकेट अकादमी करंडक टी-20 प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा

पुणे – विवान व्यास आणि निलय काशिद यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर संजय क्रिकेट अकादमी संघाने बारणे क्रिकेट अकादमी संघाचा 8 गडी राखून पराभव करत येथे होत असलेल्या युनायटेड स्पोर्टस क्‍लब आणि जस क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित जस क्रिकेट अकादमी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित टी-20 प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली.

धानोरी येथील प्रकाश टिंगरे मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत संजय क्रिकेट अकादमीच्या शिस्तबद्ध गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणापुढे बारणे क्रिकेट अकादमी संघाने 20 षटकांत 9बाद 82 धावाच करता आल्या. यात अथर्व चौधरी नाबाद 23, गणेश काळेले 13, वेदांत अमृतकर 10 याने थोडासा प्रतिकार केला. संजय क्रिकेट अकादमीकडून विवान व्यास (3-5), निलय काशिद (2-2), आदित्य शिंदे (1-24) यांनी सुरेख गोलंदाजी करत बारणे क्रिकेट अकादमीच्या फलंदाजांना बांधुन ठेवले.

प्रत्युत्तरात खेळताना संजय क्रिकेट अकादमी संघाने 18.3 षटकांत 2 बाद 83 धावा करून बारणे क्रिकेट अकादमीने दिलेले आव्हान पूर्ण केले. यामध्ये पृथ्वी सिंगने 18 धावा, आदित्य शिंदेने नाबाद 15 धावा, स्वजय सुतारने नाबाद 9 धावा करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. यावेळी 2 धावा देत 2 गडी बाद करणारा निलय काशिद सामनावीर ठरला.

सविस्तर निकाल :

साखळी फेरी : बारणे क्रिकेट अकादमी: 20 षटकांत 9 बाद 82 (अथर्व चौधरी नाबाद 23, गणेश काळेले 13, वेदांत अमृतकर 10, विवान व्यास 3-5, निलय काशिद 2-2, आदित्य शिंदे 1-24) पराभूत वि. संजय क्रिकेट अकादमी: 18.3 षटकांत 2 बाद 83 (पृथ्वी सिंग 18, आदित्य शिंदे नाबाद 15, स्वजय सुतार नाबाद 9, विश्वजीत फेगडे 1-5). सामनावीर-निलय काशिद.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.