बास्केटबॉल स्पर्धा : ऑल स्टार्स, हूपर्स, महाराष्ट्रीय मंडळ, ऑर्किड संघांची आगेकूच

आठवी महादेवराव निम्हन स्मृती करंडक बास्केटबॉल स्पर्धा

पुणे – मुलांच्या गटात ऑल स्टार्स अ, हूपर्स, अनिरुद्ध बास्केट बॉल क्‍लब अ आणि डी.जी. अ च्या संघांनी तर, मुलींच्या गटात ऑर्किड, एसपीएम आणि महाराष्ट्रीय मंडळच्या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करत येथे होत असलेल्या आठव्या महादेवराव निम्हन स्मृती करंडक बास्केटबॉल स्पर्धेत आगेकूच नोंदवली.

यावेळी मुलांच्या गटातील पहिल्या सामन्यात ऑल स्टार्स अ च्या संघाने आयडीयलच्य संघाचा 34 विरुद्ध 19 ने पराभव करत आगेकूच केली. यावेळी ऑलस्टार्सच्या शिवांश महाजनने 16 गुण करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर, दुसऱ्या सामन्यात हूपर्सच्या संघाने अनिरुद्ध बास्केटबॉल क्‍लब अच्या संघाचा 37 विरुद्ध 30 अशा फरकाने पराभव करत आगेकूच केली. यावेळी हूपर्सच्या आर्यन जोशीने 16 तर निर्मल शिंदेने 7 गुण करत संघला विजय मिळवून दिली.

मुलांच्या गटातील तिसऱ्या सामन्यात अनिरुद्ध ऍकॅडमीच्या ब संघाने ऑल स्टार्सच्या ब संघाचा 38 विरुद्ध 6 असा एकतर्फी पराभव करत आगेकूच केली. यावेळी अनिरुद्ध बास्केटबॉल ब संघाकडून स्नेह शहाने 19 तर तन्मय शिंदेने 8 गुण करत आगेकूच केली. यावेळी झालेल्या अखेरच्या सामन्यात डी.जी अ संघाने ऑर्किड संघाचा 51 विरुद्ध 10 असा पराभव करत आगेकूच केली. यावेळी डी.जी. अ संघच्या सिद्धांत केंजळेने 10 आणि यश मानेने 6 गुण करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

मुलींच्या गटातील पहिल्या सामन्यात ऑर्किडच्या संघाने ऑल स्टार्सच्य संघाचा 26 विरुद्ध 0 असा पराभव करत आगेकूच केली. यावेळी ऑर्किडच्य प्राची पवारने 12 गुण करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर, दुसऱ्या सामन्यात एसपीएमच्या संघाने सोमन्सच्या संघाचा 34 विरुद्ध 2 असा पराभव करत आगेकूच केली. यावेळी एसपीएमच्या हर्शदा घनवटने 12 गुण करत संघाला विजय मिळवून दिला. तर, अखेरच्या सामन्यात महाराष्ट्रीय मंडळच्या संघाने अनिरुद्ध बास्केटबॉल क्‍लबचा पराभव करत आगेकूच नोंदवली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.