हैदराबाद – भारताचा माजी कसोटीपटू व संपूर्ण कारकीर्दीत ऑस्ट्रेलिया संघाची डोकेदुखी बनलेल्या व्हि. व्हि. एस. लक्ष्मण याने मायकेल क्लार्कवर ताशेरे ओढले आहेत. आयपीएल खेळण्याची संधी मिळावी व मोठ्या रकमेचे करार मिळविण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज भारताचा कर्णधार विराट कोहलीविरुद्ध स्लेजिंगकरत नाहीत असे क्लार्कने व्यक्त केले होते. त्यावर टीका करताना आयपीएल खेळण्यासाठी वशिला किंवा खुषमस्करी नव्हे तर गुणवत्ताच कामी येते असे सांगितले.

आयपीएलमध्ये मोठ्या रकमांचे करार मिळावेत यासाठी ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू कोहलीविरुद्ध स्लेजिंक करत नाहीत. तसेच त्याला फलंदाजी दरम्यान एकाग्रता भंग व्हावी यासाठीही प्रयत्न करत नाहीत. त्याला खूष व आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात असे क्लार्कने व्यक्त केले होते. क्लार्कचे मत खोडून काढताना लक्ष्मणने आयपीएलच नव्हेतर कोणत्याही स्पर्धेत खेळण्यासाठी वशिला नाही तर गुणवत्ताच महत्त्वाची ठरते असे मत व्यक्त केले.

श्रीकांतही बरसले…

मायकेल क्लार्क हा माजी कर्णधार आहे. त्याने कोणतेही विधान करताना जबाबदारीचे भान ठेवायला हवे. आपल्याच देशाच्या संघातील खेळाडूंबाबत त्याने केलेले विधान अत्यंत मूर्खपणाचे आहे, अशा शब्दात भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी क्लार्कची खिल्ली उडविली आहे.