पुणे जिल्हा | अंथुर्णे येथील कुस्ती स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

इंदापूर, (प्रतिनिधी) – आमदार दत्तात्रय भरणे यांच्या संकल्पनेतून आणि कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सलग तीन दिवस इंदापूर क्रीडा महोत्सव नवीन क्रीडा संकुल अंथुर्णे येथे उत्साहात पार पडला.
रविवार सायंकाळी कुस्ती स्पर्धेतील इंदापुर केसरीची अंतिम लढत पार पडली. तालुक्यांतील युवक-युवतींना खेळाचे व्यासपीठ तयार व्हावे हा हेतू ठेऊन आयोजित केलेल्या या महोत्सवास अधिकाधिक खेळाडूंचा उत्तम प्रतिसाद पहावयास मिळाला.
महोत्सवात तालुक्यांतील गावनिहाय संघ सहभागी झाले होते. यामध्ये क्रिकेट, कबड्डी, व्हॉलिबॉल, बॅडमिंटन, मॅरेथॉन, कुस्ती (14 वर्षाखालील किशोर केसरी, 17 वर्षाखालील कुमार केसरी, ओपन गट इंदापूर केसरी) या खेळांचा समावेश होता.
यामधील खेळाप्रमाणे प्रथम चार विजेते- क्रिकेट – गलांवाडी संघ, भिगवण संघ, बोरी संघ व सणसर संघ. कबड्डी- एस बी स्पोर्टस् अॅकॅडमी पळसदेव, श्री पळसनाथ कबड्डी पळसदेव, निमसाखर अ, इंदापूर व्यायाम मंडळ.
मुले महाराणा कळंब, निरवांगी, बोरी कबड्डी संघ, राणा प्रताप कळंब. बॅडमिंटन- मुली रिशा गोयल बळवंड राधिका (बारामती), मधुरा वाघमोडे (काटी) गायत्री सोनटक्के, अवंतिका माने सदफ खान (कळंब), तनिष्का बळवंड वैष्णवी (बारामती). मुले- संस्कार शिवशरण सलील मणेरी (वालचंदनगर), विवेक मिसाळ (कळंब) तेजस पवार (वालचंदनगर),
रियाज मुलाणी रितेश अथनी (कळंब), रोनित पाटील (कळंब) रोहन फडतरे (वालचंदनगर). पहिले आठ क्रमांक व्हॉलिबॉल – बोरी अ, काझड अ, उद्धट ब, नागेश्वर अंथुर्णे, पाचवा उद्धट अ, सहावा बोरी ब, सातवा जंक्शन, आठवा दत्तनगर लाकडी.
मॅरेथॉन- मुली- शितल भगत, मनुजा डोंगरे, सिद्धी शेंडे, दिव्या चितळकर, गौरी शेंडे, प्रतिक्षा कचरे, पूर्वा जाधव, अंकिता पवार. मुले- गणेश खोमणे, अभिजीत कांबळे, विकास पोळ, बालाजी अडवाल, प्रतीक घोरपडे, आबासो राऊत, बालाजी राऊत, गणेश तनपुरे.





