पिंपरी | अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग जनजागृती मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी, (प्रतिनिधी) – अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत पालिकेला तब्बल 1000 पेक्षा अधिक सूचना प्राप्त झाल्या आहेत.
या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रश्न, उपाययोजना, प्रकल्प यासाठी सहभाग नोंदवता येणार असून नागरिकांनी ऑनलाइन माध्यमातून झउचउ डरीरींहळ -झझ द्वारे अर्ज करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग या उपक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पालिकेने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत शहरातील अनेक महाविद्यालयांना भेटी देण्याचे काम सुरु असून त्यांच्या प्रतिनिधींमार्फत प्रत्यक्ष वर्गांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना या उपक्रमाचे महत्व समजावून सांगण्यात येत आहे.
पालिकेतर्फे रस्ते, उद्यान, पाणीपुरवठा आणि इतर सुविधा कशा पुरवल्या जातात?, त्यासाठीचे आर्थिक निर्णय कसे घेतले जातात?, या सर्व गोष्टींसाठी अर्थसंकल्प कसे आवश्यक असते?, विद्यार्थ्यांना देखील या प्रक्रियेत कशी महत्त्वाची भूमिका बजावता येते, या सर्वांची इत्यंभूत माहिती देऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली जात आहे.
तसेच विद्यार्थ्यांना त्यांची विचार क्षमता वापरायची ही उत्तम संधी असल्याने हे विद्यार्थी वर्गातच तिथल्या तिथे टठ कोड स्कॅन करून आपापल्या परिसरातील सुविधा तसेच प्रश्नांबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
या जनजागृती मोहिमेसाठी पालिकेकडून सकाळी कचरा गोळा करणार्या जवळपास 500 घंटागाड्यांचा देखील प्रभावीपणे वापर केला जात आहे. या गाड्यांमार्फत शहरातील प्रत्येक गल्लीत आणि मोहल्ल्यात या जनजागृती मोहिमेची प्रचार धून ऐकू येत आहे.
विविध औद्योगिक कंपन्या, सरकारी कार्यालये, रुग्णालये यांपासून ते थेट मजूर अड्डे तसेच जन्माष्टमी निमित्त विविध मंदिरांमध्ये होणारी गर्दी, दही हंडी निमित्त रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात उतरणारे नागरिक तसेच पालिकेच्या दर सोमवारी आयोजित केल्या जाणार्या जनसंवाद सभांच्या गर्दीचा देखील प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेण्यात येत आहे. सोशल मीडिया प्रचार तंत्राचा प्रभावी वापर हे देखील या जनजागृती मोहिमेचे वैशिष्टय ठरले आहे.





