नेवासा – नेवासा शहरात भारतीय जनता पार्टीच्यावतीने सोमवार, २१ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अहिल्यादेवी मंदिराच्या प्रांगणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांच्या हस्ते झाले. शिबिराला शहरातील युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, ऋषिकेश शेटे, प्रताप चिंधे, मनोज पारखे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, बाळासाहेब पवार, अशोक कोळेकर, अंकुश भांगे, डॉ. बाळासाहेब कोलते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. निलेश लोखंडे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश सचिव अमृता नळकांडे, डॉ. मनीषा वाघ, शिवाजी लष्करे, नानासाहेब डौले, रामदास लष्करे, सचिन काळे, आदिनाथ पटारे, सुधाकर शेंडे, शोभा आलवणे, गणेश चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदान शिबिराला मिळालेल्या उत्साहपूर्ण प्रतिसादामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य सामाजिक उपक्रमाने साजरे झाले.