पिंपरी : दरवर्षीप्रमाणे यंदाही चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास वकिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या माजी महिला सचिव ॲड. मोनिका गाढवे यांच्या वाढदिवसानिमित्त ॲड. गाढवे आणि वकील बांधवानी या शिबिराचे आयोजन केले होते. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्यास रक्तदान केल्याबद्दल प्रमाणपत्र व ॲड. मोनिका गाढवे यांच्याकडून पाण्याचा जार देण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड ॲड.बार असोसिएशनचे अध्यक्ष गौरव वाळुंज, माजी अध्यक्ष ॲड.रामराजे भोसले, ॲड.विलास कुटे, ॲड.जयश्री कुटे, मुकुंद ओव्हाळ, ॲड. अय्याज शेख, ॲड. ऋषिकेश गुजर, ॲड. सारिका भोसले, तसेच शिव वाहतुक सेना अध्यक्ष गणेश खरात, लक्ष्मण भोसले, शिवशक्ती ना. सहकारी पतसंस्थेचे संचालक राजाराम सावंत , यशवंत माळी, लायन्स क्लबचे सदस्य अनिल झोपे, एलआयसीचे विकसन अधिकारी प्रशांत तरडे, विवेक बजाज, सामाजिक कार्यकर्ते सागर रांजणे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी डॉक्टर्स व रक्तदाते उपस्थित होते तसेच ॲड. विजयाराणी मेलगे व प्रतीक्षा जाधव ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. राजाराम सावंत यांनी सांगितले की, रक्तदान शिबिराचे हे तिसरे वर्ष असून ही रक्तदानाची परंपरा अशीच पुढे चालू ठेवावी व जास्तीत जास्त लोकांनी वाढदिवसांच्या निमित्ताने लोकांच्या जीवितास आवश्यक उपक्रम करावेत ही भावना व्यक्त केली. ॲड. मोनिका गाढवे म्हणाल्या की, रक्तदान हे अनेकांसाठी वरदान ठरते. या शिबिरामुळे अनेकाचे प्राण वाचणार असून एक सामाजिक कार्याचे समाधान मिळते या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाल्याचा आनंद आहे. त्यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले.