पश्चिम बंगालच्या विकासाला दीदी ‘स्पीड ब्रेकर’ कारणीभूत – नरेंद्र मोदी

सिलिगुरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचाराला बुधवारी सुरुवात केली. पश्चिम बंगालमधील आपल्या पहिल्याच सभेत नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पश्चिम बंगालच्या विकासात ममता बॅनर्जी या स्पीड ब्रेकर ठरत असल्याचा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला.

सिलिगुरी येथील सभेत बोलताना नरेंद्र मोदींनी इतर राज्यांप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये गतीने विकास होऊ शकला नाही, याचे कारण पश्चिम बंगालमध्ये स्पीड ब्रेकर आहे ज्याला दीदी म्हणून ओळखले जाते. दीदींना गरिबी हटवायची नाही, असा आरोप यावेळी केला. पुढे बोलताना जर गरिबीच संपली तर राजकारणही संपेल. त्यामुळे त्यांना गरिबी पहायची आहे आणि म्हणूनच त्यांनी गरिबांसाठी सुरु असणारे विकास प्रकल्प थांबवले आहेत, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.

नरेंद्र मोदींनी यावेळी चीट फंड स्कॅमचा उल्लेख केला तसंच एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल टीका केली. जेव्हा बालाकोट येथे एअर स्ट्राइक केला त्यावेळी आपल्याच देशातील काहींनी यावर प्रशचिन्ह उपस्थित केल्याचे सांगत, कदाचित दीदींना हे आवडलं नाही. महाआघाडातील नेत्यांनाही हे आवडलं नाही. ते पाकिस्तानात हिरो झाले आहेत, असा टोला देखील नरेंद्र मोदींनी लगावला.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.