Nitin Gadakari : नागपूरात इमर्जन्सी सिनेमाच विशेष स्क्रीनिग; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती, कंगणाने केली पोस्ट म्हणाली…

अभिनेत्री कंगणा राणावत तिच्या इमर्जन्सी सिनेमाला घेऊन खूप उत्सुक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा केली जात होती. अखेर हा सिनेमा आता रिलीजसाठी सज्ज झाला आहे. १७ जानेवारीला इमर्जन्सी हा सिनेमा थिएटर्समध्ये रिलीज करण्यात येणार आहे. त्यापूर्वी कंगणाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी नागपूरात या सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग ठेवलं होतं. याची पोस्ट सोशल मीडियावर कंगणाने केली आहे. दरम्यान, सिनेमातील तिच्या भूमिकेच्या लूकबद्दल ती इन्स्टाग्रामवरून माहिती देत होती. तसेच या लूकचे फोटोज देखील ती आपल्या चाहत्यांसाठी या आधीच शेअर केले आहेत.
कंगणाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्यासोबत सिनेमाच्या स्क्रीनवेळीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत कंगणा ही नितीन गडकरी यांच्यासोबत बसलेली दिसत आहे. अनुमप खेर हेही तिथेच उभे आहेत. त्यांच्यामध्ये संभाषण चालू असल्याचे दिसते. कंगनाने चाहत्यांना अपडेट केलं होतं की नागपुरात नितीन गडगरींसाठी या सिनेमाच विशेष स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात येणार आहे.
दुहेरी जबाबदारी
इमर्जन्सी या सिनेमात मुख्य भूमिका आणि दिग्दर्शनाची जबाबदारी अशी दुहेरी भूमिका कंगणाने साकारलेली आहे. हा सिनेमा राजकीय घटनांचा साक्ष देणारा असून १९७५ साली ज्यावेळी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधीचं सरकार देशात होतं. त्यावेळची परिस्थिती या सिनेमात दाखवण्यात आली आहे. या सिनेमात श्रेयस तळपदे, अशोक छाबरा, महिमा चौधरी आणि सतीश कौशिक यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमात कंगणाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची व्यक्तीरेखा साकारलेली आहे.





