सुषमा अंधारेंची रक्षाबंधननिमित्त खास पोस्ट; उद्धव ठाकरेंना राखी बांधत म्हंटले “भावाचे राज्य येवू दे…”

Sushma Andhare Raksha Bandhan Post | देशभरात आज रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक राजकीय नेते मंडळी देखील रक्षाबंधन साजरा करत आहेत. सुषमा अंधारे यांनी देखील उद्धव ठाकरेंना राखी बांधली आहे. याचे काही फोटो देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र फोटोसह त्यांनी लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या फायर ब्रॅण्ड नेत्या अशी ओळख असलेल्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर रक्षाबंधननिमित्त काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सुषमा अंधारे यांनी रक्षाबंधननिमित्त उद्धव ठाकरेंना राखी बांधल्याचं पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंना ओवाळतानाचाही एक फोटो सुषमा अंधारेंनी पोस्ट केला आहे. रक्षाबंधननिमित्त सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना खास भेटवस्तू दिल्याचंही फोटोंमध्ये दिसत आहे.
इडा पीडा जाऊ दे…भावाचे राज्य येवू दे.. भावाला माझ्या सौख्य लाभू दे.. त्याचा वंशवेलू गगनाला भिडू दे…@OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
#राखीपौर्णिमा pic.twitter.com/KwfLmZsZ13— SushmaTai Andhare (@andharesushama) August 19, 2024
या फोटोसह सुषमा अंधारेंनी ‘इडा पीडा जाऊ दे… भावाचे राज्य येवू दे.. भावाला माझ्या सौख्य लाभू दे.. त्याचा वंशवेलू गगनाला भिडू दे…’ अशी कॅप्शन त्यांनी दिले आहे. शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर सुषमा अंधारे या ठाकरे गटासोबत राहिल्या. त्यांच्या भाषणांमुळे आणि बेधडक भूमिकेमुळे त्या अल्पवावधीत ठाकरे गटातील एक प्रमुख नेत्या म्हणून प्रसिद्ध झाल्या.
हेही वाचा:
बिहारमध्ये राजदला बसणार मोठा धक्का ! मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कोणती योजना बनवली?, वाचा सविस्तर




