पुणे : सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी येणाऱ्या रसिकांसाठी महामेट्रोतर्फे विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अंतर्गत महोत्सवाच्या कालावधीमध्ये मेट्रो रात्री ११:०० वाजेपर्यंत प्रवाशांच्या सेवेमध्ये असेल. तसेच, शनिवारी रात्री १२:०० वाजेपर्यंत मेट्रोची सुविधा उपलब्ध असेल. याशिवाय स्वारगेट मेट्रो स्टेशन ते सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे ठिकाण म्हणजे मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुल यामध्ये शटल बस सर्व्हिस मेट्रो तर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक २० मिनिटानंतर ही शटल बसफेरी असणार आहे आणि याचे तिकीट फक्त रुपये १० असणार आहे.