करवाढीसाठी पालिकेची खास सभा

12 टक्‍के मिळकतकर वाढीबाबत होणार निर्णय 

पुणे – महापालिका प्रशासनाकडून आयुक्‍तांच्या अंदाजपत्रकात प्रस्तावित केलेल्या मिळकतकर वाढीवर निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीची खास सभा बोलवली आहे. येत्या गुरुवारी (दि. 30) ती होणार आहे. दरम्यान, आयुक्‍तांनी अंदाजपत्रक सादर करण्यापूर्वीच हा करवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीत दिला होता.

मात्र, अद्याप त्याबाबत निर्णय घेतला नसला तरी, मान्यता मिळेल या भरवशावर आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी नुकत्याच सादर केलेल्या अंदाजपत्रकात तब्बल 160 कोटींची करवाढ गृहीत धरली आहे. तर स्थायी समिती अध्यक्षांनी या पूर्वीच पुणेकरांवर कोणतीही करवाढ लादणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ही खास सभा आयुक्‍तांच्या अंदाजपत्रकाला सुरूंग लावणार की पुणेकरांवर करवाढ लादणार हे निश्‍चित होणार आहे.

प्रस्तावावर 20 फेब्रुवारीपूर्वी निर्णय घेणे बंधनकारक
आयुक्‍त गायकवाड यांनी नुकतेच महापालिकेचे 2021 चे अंदाजपत्रक सादर केले. त्यात आयुक्‍तांनी मिळकतकरातील सर्वसाधारण करात 12 टक्‍के तर, पाणीपट्टीत 15 टक्‍के वाढ प्रस्तावित केली आहे. हा करवाढीचा प्रस्ताव आयुक्‍तांच्या अंदाजपत्रकापूर्वी ठेवण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावावर स्थायी समितीला 20 फेब्रुवारीपूर्वी निर्णय घेणे बंधनकारक आहे. मात्र, आयुक्‍तांनीच अंदाजपत्रकात करवाढीचे उत्पन्न गृहीत धरल्याने स्थायी समितीने या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी विशेष बैठक बोलविली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.