बॉलीवूड अभिनेता सोनू सूद आज आपला 47वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान सोनूने गरजूंना केलेल्या मदतीची देशभर प्रशंसा करण्यात आली होती. हे काम सध्याही सुरू असून त्याने आणखी एक ट्विट करत वाढदिनी परप्रांतीयांना खास भेट दिली आहे. त्याने घोषणा केली आहे की, तो आता परप्रांतीयांना रोजगार देण्यासाठी मदत करणार आहे. यासाठी त्याने एक ऍपही लॉंच केले आहे.
सोनूने आपल्या जन्मदिनानिमित्त जाहीर केलेल्या ऍपचे नाव “प्रवासी रोजगार’ असे ठेवले आहे. या ऍपच्या माध्यमातून सुमारे 3 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे समजते. एवढेच नव्हे तर पूरग्रस्त असलेल्या बिहार आणि आसाम येथे तातडीने सुरुवात करण्यात येणार आहे.
आपल्या पोस्टमध्ये सोनू म्हणाला की, माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या प्रवासी भावांना ही खास भेट आहे.
सोनूने ट्विट केले की, माझया वाढदिवशी देशभरातील माझ्या बांधवांसाठी http://PravasiRojgar.com चा 3 लाख नोकरीसाठी माझा करार. या सर्व चांगले वेतन, पीएफ, ईएसआय आणि अन्य लाभ प्रदान करतात.
धन्यवाद AEPC, CITI, Trident, Quess Corp, Amazon, Sodexo, Urban Co , Portea आणि अन्य सर्वांचे. त्याने आपल्या या पोस्टमध्ये आता भारत होणार कामयाबला (#AbIndiaBanegaKamyaab) हॅशटॅग केले आहे.