बहुमत परिक्षेविषयी सभापतींचे मौन

भोपाळ : राज्यपालांनी सोमवारी बहुमत सिद्ध करण्याचा आदेश सरकारला दिला असला तरी त्यानुसार बहुमत परिक्षा करण्याच्या संबंधातील निर्णय सभापती एन. पी. प्रजापती हे उद्या जाहीर करणार आहेत.

सभापती जेव्हा आदेश देतील तेव्हाच ही बहुमत परिक्षा होणार आहे. त्यांनी आज या संबंधात काहीही बोलण्यास नकार दिला. मध्यप्रदेश विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून सुरू होंत आहे.

त्याची सुरूवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल आणि त्यानंतर बहुमत चाचणी घेण्याचा आदेश राज्यपालांनी दिला असला तरी विधानसभेतील कामकाजाच्या संबंधात सभापतींचा निर्णय अंतिम असल्याने उद्या सभापती काय निर्णय देणार त्यावर सर्व अवलंबून आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.