सपा उमेदवार चंद्रावती वर्मा यांचा ‘ओले-ओले’ डान्स व्हायरल (व्हिडिओ); उमेदवार म्हणाल्या…

Updated On:

उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील रथ विधानसभा मतदारसंघातील सपा उमेदवार चंद्रावती वर्मा यांचा डान्स आणि स्विमिंग पोशाखातील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सपा उमेदवाराचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी त्यांना ट्रोल करणे सुरु केले आहे. यावर चंद्रावती यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर सपा उमेदवार म्हणाला की मला माझ्या टॅलेंटचा अभिमान आहे. त्यांचे व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने सादर केले जात आहेत.

चंद्रावती वर्मा म्हणाल्या, मी लोकांकडून आशीर्वाद मागत आहे. मला लहानपणापासून बंधने आवडत नव्हती. सर्वांना समान सन्मान मिळायला हवा, हे संविधानात आहे. मी खेळाची निवड केली कारण त्यामुळे इच्छाशक्ती मजबूत होते. त्याच्यातून मी बाहेर आले आहे. व्हायरल झालेल्या डान्स व्हिडिओवर बोलताना चंद्रावती वर्मा म्हणाल्या, मला डान्स खूप आवडतो. माझ्या डान्सचा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर मांडला जात आहे. मी माझ्या डान्स व्हिडिओंद्वारे मुलींसाठी दारे खुली केली आहेत की नृत्य करणे वाईट नाही.

ट्रोलिंग करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना वर्मा म्हणाल्या, मला आभार मानायचे आहे, कारण मला स्वतःचा अभिमान आहे, तुम्ही माझ्या कलागुणांना वाव देत आहात. ”महिला म्हणून मला महिलांना बळकट करायचे आहे आणि एक खेळाडू म्हणून मला खेळासाठीही काम करायचे आहे.”

काय आहे संपूर्ण प्रकरण?
चंद्रावतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती तिच्या दोन मैत्रिणींसोबत डान्स करताना दिसत आहे. याशिवाय स्विमिंग कॉस्च्युममधील काही फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर याला विरोध होत आहे.

कोण आहेत चंद्रावती वर्मा?
चंद्रावती वर्मा ह्या गोहंड ब्लॉकच्या इटौरा गावातील रहिवासी धनीराम वर्मा यांची मुलगी आहेत. राजकारणापूर्वी त्या हैदराबादमध्ये जिम ट्रेनर होत्या.चंद्रावतीने गोहंद इंटर कॉलेजमधून इंटरमिजिएटचे शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर त्यांनी ओराईमधून पदवी घेतली.चंद्रावतीची आवड सुरुवातीपासूनच खेळात आहे.याच कारणामुळे ती फिटनेस ट्रेनर बनली. यावेळी चंद्रावती हमीरपूर जिल्ह्यातील रथ विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

UP Politics : पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांना मोठा झटका; राज्यसभेच्या उमेदवार यादीतून वगळले

2026-10-05 17:33:22

UP Politics : पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांना मोठा झटका; राज्यसभेच्या उमेदवार यादीतून वगळले

Sudhanshu Trivedi : पायलट स्मितबाबत काॅंग्रेसचे मौन का? भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांची टीका

2026-10-04 16:06:49

Sudhanshu Trivedi : पायलट स्मितबाबत काॅंग्रेसचे मौन का? भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांची टीका

INDIA Aghadi : राहुल गांधींची ताकद वाढली; माजी मंत्री थेट पक्षासह इंडिया आघाडीत सामील

2026-10-03 15:43:17

INDIA Aghadi : राहुल गांधींची ताकद वाढली; माजी मंत्री थेट पक्षासह इंडिया आघाडीत सामील

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशासाठी भाजपची रणनीती तयार? तब्बल 100 आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता

2026-10-03 12:56:34

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशासाठी भाजपची रणनीती तयार? तब्बल 100 आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता

Akhilesh Yadav: "एक कचोरी, दो समोसा, BJP पर नहीं भरोसा...." ; अखिलेश यादव जनरल-झेड ट्रेंडमध्ये सामील

2026-10-01 15:12:07

Akhilesh Yadav: "एक कचोरी, दो समोसा, BJP पर नहीं भरोसा...." ; अखिलेश यादव जनरल-झेड ट्रेंडमध्ये सामील