मुख्यमंत्र्यांच्या मागणीला यश, सोयाबीन खरेदीला मिळाली 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Soyabean Purchase Deadline : सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला असून, केंद्र सरकारद्वारे सोयाबीन खरेदीसाठीची तारीख वाढवण्यात आली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे.
यापूर्वी पणन संचालयानातर्फे शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करण्याची अंतिम तारीख 13 जानेवारी होती. मात्र, शेतकऱ्यांकडून या कालावधीत वाढ करण्यात यावी अशी मागणी केली जात होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केंद्रिय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना याबाबत विनंती केली होती. अखेर केंद्र सरकारकडून या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी मा. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहानजी यांना दूरध्वनी करुन केली होती, ती मागणी त्यांनी लगेच मंजूर करीत 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. यामुळे आमच्या शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळेल.
मी देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी… https://t.co/sD4IBIKYdO pic.twitter.com/CCvCNmQ8oy— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 13, 2025
आता 31 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदी सुरू राहणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत म्हणाले की, ‘सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी मा. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहानजी यांना दूरध्वनी करुन केली होती, ती मागणी त्यांनी लगेच मंजूर करीत 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. यामुळे आमच्या शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळेल. मी देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहानजी यांचा अतिशय मनापासून आभारी आहे.’
दरम्यान, 15 ऑक्टोबर 2024 पासून सोयाबीन खरेदीला सुरुवात झाली होती. आता 31 जानेवारीपर्यंत मुदत वाढ मिळाल्याने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी किमान आधारभूत किमतीवर सोयाबीनची खरेदी सुरू असून आतापर्यंत विक्रमी 13 लाख 68 हजार 660 मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करण्यात आला आहे.





