मुंबई – साऊथ स्टार किच्चा सुदीप नेहमीच त्याच्या हटके सिनेमांमुळे चर्चेत असतो. आता देखील किच्चा त्याच्या एका आगळ्यावेगळ्या निर्णयामुळे चर्चेत आला आहे. हा निर्णय त्याच्या सिनेमाबाबत नसून एका सामाजिक बांधिलकीबाबत आहे. किच्चाने नुकतीच आपण गाई दत्तक घेणार असल्याची घोषणा केली. पुण्यकोटी दत्तू योजनेअंतर्गत किच्चा सुदीप कर्नाटकातील प्रत्येक जिल्ह्यांमधून एक गाय दत्तक घेणार आहे. अशा तो ऐकून ३१ गायी दत्तक घेणार असल्याचे समजते. गुरुवारी किच्चाने कर्नाटकच्या पशु संवर्धन मंत्र्याच्या घरी गौ पूजा केली. राज्य सरकारने माझी पुण्य कोटी दत्तू योजनेच्या अँबिसिटरपदी नियुक्ती केल्याने माझी जबाबदारी वाढली असल्याचे यावेळी किच्चा म्हणाला. कर्नाटकात गो हत्या बंदी कायदा लागू झाल्यानंतर तब्बल १०० गोशाळा उभ्या राहिल्या आहेत. ही योजना राबवणार कर्नाटक हे देशातील पाहिलं राज्य आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वाढदिवशी ११ गाई घेतल्या मंत्री प्रभू चव्हाण यांनी देखील ३१ गाई दत्तक घेण्याची घोषणा केली. हे पाहून मी देखील प्रत्येक जिल्ह्यातून १ गाय दत्तक घेणार असल्याचे किच्चा सुदीपने जाहीर केले.