#CWC19 : नाणेफेक जिकूंन दक्षिणआफ्रिकेचा फलंदाजीचा निर्णय

मॅंचेस्टर – साखळी गटात अग्रस्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाची आज येथे दक्षिण आफ्रिकेविरूद्ध लढत होत असून त्यामध्ये कांगारूंचे पारडे जड राहील असा अंदाज आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांना येथील कटू आठवणी पुसण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच उपांत्य फेरी निश्‍चित केली आहे. आफ्रिकेच्या बाद फेरीच्या आशा यापूर्वीच मावळल्या आहेत. हा सामना जिंकून अग्रस्थान कायम राखण्यासाठी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाकडून प्रयत्न होईल.

तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा दक्षिण आफ्रिकेने जिंकला असून आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यु प्लेसिस याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दक्षिण आफ्रिका संघ – क्विंटन डी कॉक, ऐडेन मारक्रम, फाफ डू प्लेसी, रैसी वैन डर डुसेन, जेपी डुमिनी, डी.प्रीटोरियस, एन्डिले फेहलुकवेओ, क्रिस मॉरिस, कगिसो रबाडा, इमरान ताहिर, तबरेज़ शम्सी

ऑस्ट्रेलिया संघ – ऐरन फ़िंच, डेविड वार्नर, उस्मान ख्वाजा, स्टीव स्मिथ, ग्लेन मैक्सवेल, मार्कस स्टोइनिस, एलेक्स कैरी, पैट कमिन्स, मिचेल स्टार्क, जेसन बेहरनडोर्फ़, नाथन लायन

Leave A Reply

Your email address will not be published.