मॅंचेस्टर – फाफ डू प्लेसीच्या शतकी तर रसी व्हॅन डर दुसे आणि क्विटंन डी कॉक यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर 326 धावांचे आव्हान ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिकंत प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 बाद 325 धावसंख्येपर्यंत मजल मारली.
INNINGS BREAK | SA 325/6, 50 overs
A wicket on the last delivery of the innings, @Rassie72 falling 5 runs short of his maiden ton.
The Proteas have amassed 325 runs in their 50 overs #CWC19 #ProteaFire🔥 #AUSvSA pic.twitter.com/JqaU1pCqXQ
— Proteas Men (@ProteasMenCSA) July 6, 2019
दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार फाफ डू प्लेसी याने 94 चेंडूत 100 धावा केल्या तर रसी व्हॅन डर दुसे याने 97 चेंडूत 95 धावा केल्या. याशिवाय क्विंटन डी काॅक याने 52 आणि एडेन मारक्रमने 34 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत मिचेल स्टार्क याने 9 षटकांत 59 धावा देत सर्वाधिक 4 गडी बाद केले, तर नाथन लायन याने 2, कमिन्स आणि जेसन बेहरनडोर्फने प्रत्येकी 1 गडी बाद केला.