Sourav Ganguly : टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या कारचा भीषण अपघात

कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. पश्चिम बंगालमधील दुर्गापूर एक्स्प्रेस वेवरील दंतनपुरा भागात हा अपघात झाला आहे. सौरव गांगुली बर्धवान या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी जात असताना हा अपघात झाला.
काय घडले नेमके?
दंतनपुराजवळ एक ट्रक अचानक गांगुलीच्या ताफ्याच्या समोर आला. त्यामुळे कार चालकाला अचानक ब्रेक लावावा लागला. त्यामुळे मागून येणाऱ्या भरधाव कार एकमेकांना आदळल्या. त्यातील एक कार सौरव गांगुली यांच्या कारला धडकली आणि हा अपघात झाला.
सौरव गांगुलीच्या मागे असलेल्या कारने एका रेंज रोव्हरलाही धडक दिली. मात्र, गाडीचा वेग जास्त नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी अथवा कोणीही जखमी झाले नाही. मात्र, ताफ्यातील दोन गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले. या अपघातानंतर, सौरवला एक्सप्रेसवेच्या बाजूला सुमारे 10 मिनिटे वाट पहावी लागली. त्यानंतर सौरव गांगुली पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाला.
सौरव गांगुली यांच्याबद्दल बोलायचे झाले तर ते भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आहे. त्याशिवाय त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणूनदेखील जबाबदारी पार पाडली. टीम इंडियाचा आक्रमक आणि प्रभावी कर्णधार म्हणून सौरव गांगुलीची ओळख आहे. टीम इंडियाने त्याच्या नेतृत्वात अनेक ऐतिहासिक विजय मिळवले आहेत.





