कलाकार रसिकांच्या गळ्यातील ताईत बनतात – माजी आमदार मोहन जोशी

Updated On:
कलाकार रसिकांच्या गळ्यातील ताईत बनतात – माजी आमदार मोहन जोशी

हडपसर(प्रतिनिधी) – कलाकाराला कोणी अडवू शकत नाही, ते कलेच्या माध्यमातून रसिकांच्या गळ्यातील ताईत बनतात. त्याच गुणवत्तेच्या जोरावर गोंधळनगरमधील सौम्या कांबळे हीने भारत नव्हे तर जगाच्या नकाशावर नाव झळकावले आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केले.

स्वाभिमानी महिला संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी सुरसे यांनी सातववाडी येथे गोंधळेनगरची सौम्या कांबळे हिने सोनी टीव्ही वाहिनीवरील नृत्य स्पर्धेत ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन-२’ प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावल्याबद्दल सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मोहनदादा जोशी, प्रशांत सुरसे आणि पल्लवी सुरसे यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रशांत सुरसे म्हणाले की, संस्कार आणि प्रशिक्षणातून संगीत, नृत्य आणि इतरही क्षेत्रामध्ये नवनवे कलाकार घडत आहेत. नव्या पिढीला यशस्वी कलाकार घडण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

याप्रसंगी इक्बाल शेख, विशाल मिरेकर, गणेश जगताप, हरीश शेलार, विरनाथ सरडे, गणेश काकडे, ऋषी रणदिवे, निलेश भगत, शुभम काळे, स्वप्नील भालेराव, सचिन नेमकर उपस्थित होते.

देशभरातील स्पर्धकांनी सहभागी होऊन गाजविलेल्या या स्पर्धेत सौम्याने बाजी मारली व महाराष्ट्राचे, आपल्या हडपसरचे नाव उंचावले याबद्दल तिचा सत्कार काँग्रेस नेते मोहन जोशी, प्रशांत सुरसे यांच्या हस्ते करण्यात आला.

आणखी संबंधित बातम्या

Holystico Astrana : होलिस्टिको अ‍ॅस्ट्रानाला ‘लक्झरी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ऑफ द इयर’ पुरस्कार

2026-09-11 16:28:37

Holystico Astrana : होलिस्टिको अ‍ॅस्ट्रानाला ‘लक्झरी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ऑफ द इयर’ पुरस्कार

Pune : पुणेकरांनो, उद्या 2 तास हा महत्त्वाचा रस्ता बंद! दिवेघाटात ब्लास्टिंग; जाण्यापूर्वी पर्यायी मार्ग पाहा

2026-09-10 22:48:48

Pune : पुणेकरांनो, उद्या 2 तास हा महत्त्वाचा रस्ता बंद! दिवेघाटात ब्लास्टिंग; जाण्यापूर्वी पर्यायी मार्ग पाहा

Hadapsar : सिलेंडरचा स्फोट; हडपसरमध्ये भीषण आग, आठ घरे जळून खाक

2026-09-10 22:42:41

Hadapsar : सिलेंडरचा स्फोट; हडपसरमध्ये भीषण आग, आठ घरे जळून खाक

Pune Traffic Changes : हडपसरमध्ये दहीहंडीमुळे वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग पाहा

2026-09-05 15:57:29

Pune Traffic Changes : हडपसरमध्ये दहीहंडीमुळे वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग पाहा

PMC News : चिंध्या, फर्निचरच्या कचऱ्यावर होणार प्रक्रीया; स्थायी समितीत प्रस्ताव दाखल, २० वर्षात होणार ७४ कोटींचा खर्च

2026-08-31 20:01:16

PMC News : चिंध्या, फर्निचरच्या कचऱ्यावर होणार प्रक्रीया; स्थायी समितीत प्रस्ताव दाखल, २० वर्षात होणार ७४ कोटींचा खर्च