दौंड -दिल्ली येथून केंद्र सरकारच्या वतीने रेल्वे मंत्रालयतून नऊ सदस्यांचे यात्री सुधार समितीचे पथक एच. राजा यांच्या अध्यक्षतेखाली निरीक्षणासाठी पुणे रेल्वे स्थानकात दाखल झाले. यावेळी त्यांच्याशी दौंड रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने निवेदन दिले. यावेळी दौंड विद्युत लोकलच्या प्रश्न लवकर सोडवून मुहूर्त लवकरच कळवू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पुणे रेल्वे स्थानक अधीक्षक ए. के पाठक यांच्या कार्यालायत यात्री सुधार समितीच्या सदस्यांबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली. रेल्वे प्रवाशांच्या सुविधांबाबत पुणे रेल्वे स्थानकात समितीने निरीक्षण केले. यावेळी दौंड भाजपच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी यात्री सुधार समितीचे अध्यक्ष पी. के. कृष्णदास, डॉ. राजेंद्र फडके, श्रीमान हिमाद्री बल, प्रेमानंद रेड्डी, रवींद्रनजी, डॉ. अजितकुमार, काकू विजयालक्ष्मी, दौंडचे आमदार ऍड. राहुल कुल, दौंड पुणे दौंड प्रवासी संघाचे सचिव विकास देशपांडे, उद्योजक जयवंत अभ्यंकर यांनी चर्चेदरम्यान पुणे दौंड विद्युतीकरण काम पूर्ण होऊन तीन वर्षे उलटून गेली तरी अजून लोकल कार्यान्वित होत नाही. याबाबत गाऱ्हाणी मांडली.
यावेळी विद्युत लोकल तातडीने सुरु करावी आणि दौंडला पुण्याचे उपनगर करण्यासाठी आग्रह धरला, पुणे दौंड विद्युत लोकलचा मुहूर्त लवकरच कळवू, अशी ग्वाही चर्चेअंती समितीचे अध्यक्ष कृष्णदास यांनी त्यांनी शिष्टमंडळाला दिली.
याप्रसंगी चर्चेत दौंड भाजपचे उपाध्यक्ष सुनील शर्मा, दौंड भाजपाचे शहराध्यक्ष फिरोज खान, शहर उपाध्यक्ष प्रकाश गेहानी यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी दौंड- पुणे- दौंड प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष गणेश शिंदे, सल्लागार समितीचे सदस्य आयुब तांबोळी, राहुल तोटे, नितीन बनसोडे, रेल्वेच्या विविध शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते.