बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार बॉडी आणि अभिनयात माहीर असलेला सोनू सूद सध्याच्या कठीण काळातही लोकांच्या मनावर आधिराज्य करत आहे. सोनूने अलीकडे आपले जुहूमधील हॉटेल करोनाविरोधात दिवसरात्र काम करत असलेल्या डॉक्टर, परिचारिका आणि पॅरा मेडिकल स्टाफसाठी उघडले होते.
Thank you so much bhai. Words from you give me more power and encourages me to work harder on reuniting them with their loved ones❣️Love u loads ❤️ https://t.co/QEHn4BSLPq
— sonu sood (@SonuSood) May 26, 2020
यामुळे तो मागच्या काही दिवसांपासून सोनू सूद त्याच्या मदतीमुळे सतत चर्चेत आहे. सोशल मीडियावर ट्वीटरद्वारे अनेकांनी सोनू सूदकडे मदत मागितली आणि त्यानं ती कोणालाच निराश केलं नाही. सध्या सोनू सूद जेवढ्या लोकांना शक्य आहे त्यांना मदत करताना दिसत आहे. पण लोक केवळ घरी परतण्यासाठी नाही तर कोणी दारूसाठी तर कोणी गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी सोनू सूदकडे मदत मागताना दिसत आहेत.
यावर सोनुने मजेशीर उत्तर दिले आहे . एका युजरने ट्वीटमध्ये गर्लफ्रेंडची भेट घालून देण्याची मागणी केली. त्यानं लिहिलं, ‘सोनू सूद भैय्या मला माझ्या गर्लफ्रेंडला भेटायचं आहे मदत करा.’ विशेष म्हणजे सोनू सूदनं त्याचं ट्वीट टाळलं नाही. त्यानं थोड्या मजेदार अंदाजात त्याला उत्तर दिलं, ‘थोडे दिवस गर्लफ्रेंडपासून दूर राहून बघ, तेव्हाच खऱ्या प्रेमाची परीक्षा सुद्धा होऊन जाईल’ यासोबत त्यानं हसणारा इमोजी पोस्ट केला.