‘महिलांना एक लाख देणार’ ; सोनिया गांधींची मोठी घोषणा, महालक्ष्मी योजनेंतर्गत मिळणार पैसे

Sonia Gandhi on Mahalaxmi। लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या 96 जागांवर मतदान होणार आहे. आज अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे. यामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचाही समावेश आहे. त्यातच आज काँग्रेसकडून मोठी करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानादरम्यान काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यासाठी त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी देशातील महिलांना मदत करण्यासाठी नव्या योजनेची घोषणा केलीय. त्या म्हणाल्या, “स्वातंत्र्य लढ्यात आणि आधुनिक भारताच्या उभारणीत महिलांचा मोठा वाटा आहे. आज महिलांना भीषण महागाईला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत आम्ही काँग्रेसने क्रांतिकारी हमी आणली आहे. काँग्रेसच्या महालक्ष्मी योजनेंतर्गत गरीब कुटुंबातील महिलेला दरवर्षी एक लाख रुपये दिले जाणार आहेत.”असे म्हणत त्यांनी घोषणा केली.
नमस्ते मेरी प्यारी बहनों 🙏🏼
स्वतंत्रता की लड़ाई से लेकर आधुनिक भारत बनाने में महिलाओं का बहुत बड़ा योगदान रहा है।
हालांकि आज हमारी महिलाएं भयंकर महंगाई के बीच संकट का सामना कर रही हैं।
उनकी मेहनत और तपस्या के साथ न्याय करने के लिए कांग्रेस एक क्रांतिकारी कदम लेकर आई है।… pic.twitter.com/Wk7JGt8x7r
— Congress (@INCIndia) May 13, 2024
पुढे बोलताना त्यांनी, “आमच्या हमींनी कर्नाटक आणि तेलंगणामधील कोट्यवधी कुटुंबांचे जीवन आधीच बदलले आहे. मनरेगा असो, माहितीचा अधिकार असो, शिक्षणाचा अधिकार असो किंवा अन्नसुरक्षा असो… काँग्रेस पक्षाने लाखो भारतीयांना आमच्या योजनांद्वारे बळ दिले आहे. महालक्ष्मी ही आपले कार्य पुढे नेण्याची नवीनतम हमी आहे. या कठीण काळात काँग्रेसचा हात तुमच्या पाठीशी आहे आणि हा हात तुमची परिस्थिती बदलेल, अशी ग्वाही देऊ इच्छिते.” असे म्हटले आहे.





