Sonam Wangchuk : लेह हिंसाचार प्रकरणासंदर्भात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत जोधपूर मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि सुधारक सोनम वांगचुक यांची तब्येत बिघडली आहे. शनिवारी सकाळी त्यांना कडक सुरक्षेत जोधपूर एम्समध्ये आणण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर तुरुंग प्रशासनाने त्यांची कसून आरोग्य तपासणी केली. सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अग्मो यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून तुरुंगातील पतीच्या प्रकृतीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. याचिकेत दूषित पाणी आणि तुरुंगात योग्य सुविधांचा अभाव यामुळे वांगचुक (Sonam Wangchuk) यांची प्रकृती खालावत असल्याचा आरोप करण्यात आला होता. Supreme Court याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला वांगचुक यांची त्वरित तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून न्यायालयाला सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. Parth Pawar And Supriya Sule : शपथविधीपूर्वी पार्थ पवारांनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट; राजकीय घडामोडींना वेग दूषित पाणी पिल्यामुळे प्रकृतीत बिघाड वांगचुक गेल्या काही दिवसांपासून पोटदुखी आणि पचनाच्या समस्यांबद्दल तक्रार करत होत्या. तुरुंगात दूषित पाणी पिल्यामुळे हे घडले. शनिवारी सकाळी ६:३० च्या सुमारास पोलिसांच्या पथकाने त्यांना एम्समध्ये नेले. तेथे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि इतर तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्या अनेक वैद्यकीय चाचण्या केल्या. Sonam Wangchuk : सुमारे दोन तास चाललेल्या तपासणीनंतर त्यांना पुन्हा तुरुंगात नेण्यात आले. तुरुंग प्रशासन आता त्यांचा वैद्यकीय अहवाल थेट सर्वोच्च न्यायालयात सादर करेल. Sonam Wangchuk : हेही वाचा: Alia Bhatt: “आधीसारखं राहणं शक्य नाही…” मातृत्वावर आलिया भट्टचं मनमोकळं बोलणं, सोशल मीडिया सोडण्याचीही इच्छा व्यक्त