Sonam Wangchuk Protest : तब्बल 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं ; नड्डा यांच्या उपस्थितीत उपोषण मागे, सरकारकडून तीन महत्त्वाच्या आश्वासनांनंतर निर्णय
Sonam Wangchuk Protest : NEET पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेतले आहे.

Sonam Wangchuk Protest : NEET पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेतले आहे.
मध्यरात्री सुमारे 1.30 वाजता केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. उपोषण स्थगित करण्याची माहिती सोनम वांगचुक यांनी स्वतः सोशल मीडियावरून दिली.
दरम्यान, सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले असले तरी कॉकरोच जनता पार्टीने आपले आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “26 दिवसांच्या कठोर उपोषणानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याने आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या असामान्य धैर्याला आणि त्यागाला मनापासून सलाम. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी संपूर्ण देशाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले. त्यांचे जीवन देशासाठी अत्यंत मौल्यवान आहे.”
याचबरोबर, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत जंतर-मंतर येथे सुरू असलेले पक्षाचे शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही दीपके यांनी स्पष्ट केले.
Just now in the presence of Union Ministers Sh. JP Nadda, Dr. Jitendra Singh and the senior leaders of Apex Body of Leh Ladakh I finally broke my fast after 26 days. Earlier 65 members of parliament from different political parties had visited or signed letters urging me to break… pic.twitter.com/RFCet7Oksy
— Sonam Wangchuk (@Wangchuk66) July 23, 2026
सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या? Sonam Wangchuk Protest :
रुग्णालयात झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी सरकारची भूमिका सोनम वांगचुक यांच्यासमोर मांडली. यावेळी केंद्र सरकारने तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले.
* 20 जुलै रोजी संसदेकडे शांततापूर्ण मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही.
* पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील आवश्यक सुधारणांवर संसदेत चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार आहे.
* NEET पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करेल.
26 दिवसांचे उपोषण कशासाठी? Sonam Wangchuk Protest :
सोनम वांगचुक यांनी 28 जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटी, विशेषतः NEET प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, तसेच शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी हे आंदोलन सुरू केले होते.
उपोषणाच्या 21 व्या दिवशी, म्हणजे 18 जुलै रोजी, त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि न्यायालयाच्या निर्देशानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले.
सुरुवातीला रुग्णालयात जाण्यास त्यांनी आक्षेप घेतला होता. मात्र, 24 जुलै रोजी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला.





