बॉलिवूड मधील काही ठराविक अभिनेत्री वगळता अनेक अभिनेत्री त्यांचे वाढते वय लपवण्यासाठी मेकअपचा आधार घेतात. मात्र नुकताच प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूरने तिचा भविष्यातला म्हणजेच म्हातारपणीचा फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
सोनमने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिच्या फॅनपेजवरून शेअर करण्यात आलेला एक फोटो शेअर केला. ज्यात ती 75 वर्षांची म्हातारी दिसत आहे. हा फोटो खरं तर फोटोशॉप्ड केलेला आहे. सोनमने हा फोटो शेअर करताना एक कॅप्शन दिले आहे. यात तिने लिहिले, पाहा जेव्हा ती 75-80 वर्षांची होईल तेव्हा ती अशी दिसेल. पण तरीही ती सुंदर असेल. खरंच नेहमीच ब्यूटी क्वीन फोटो पाहिल्यावर सर्वांना समजेल की म्हातारपणीही सोनम तेवढीच सुंदर दिसेल. सोनम कपूर लवकरच आगामी सिनेमा द जोया फॅक्टरमध्ये दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत दलकीर सलमान प्रमुख भूमिकेत आहे. हा सिनेमा एका कादंबरीवर आधारित आहे.