सोनम कपूर करणार कमबॅक; आगामी चित्रपटाचं शूटिंग लवकरच सुरू होण्याची शक्यता

Sonam Kapoor | अभिनेत्री सोनम कपूरने अल्पावधीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र मुलगा वायू याच्या जन्मानंतर मातृत्वाचा आनंद अनुभवण्यासाठी तिने सिनेसृष्टीपासून काही काळ दूर राहण्यास पसंती दिली. मात्र आता पुन्हा एकदा ती कमबॅक करण्यास सज्ज झाली आहे. आता ती ‘बॅटल ऑफ बिटोरा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिची बहीण रिया कपूरच या चित्रपटाची निर्मिती करत आहे.
सोनमने अलीकडेच एका मुलाखतीत बॉलिवूडमध्ये कमबॅक करायचे असल्याचे सांगितले होते. पण सिनेमात फक्त दिसायचं म्हणून तिला काम करायचं नाही. तर कथा ज्या महिला केंद्रित आहेत आणि ज्या प्रेक्षकांना चांगला संदेश देतील, अशा चित्रपटांमध्ये तिला काम करायचे आहे. ब्रेकनंतर सोनम तिच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग २०२५ च्या अखेरीस सुरु करण्याची शक्यता आहे. या चित्रपटाद्वारे ती पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एका नव्या भूमिकेत येणार आहे.
सोनमच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, ती शेवटची ब्लाइंड चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट 7 जुलै 2023 रोजी OTT प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर प्रदर्शित झाला. 2019मध्ये ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ मध्ये सोनम तिचे वडील अनिल कपूरसोबत दिसली होती. त्यात राजकुमार रावही होता. त्याच वर्षी सोनम ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटातही दिसली होती. Sonam Kapoor |
सोनमने २०१८ मध्ये आनंद आहुजासोबत लग्न केले आणि २०२२ मध्ये तिचा मुलगा ‘वायू’चा जन्म झाला. मुलाला वेळ देण्यासाठी तिने चित्रपटांमधून ब्रेक घेतला होता. मात्र फॅशन विश्वात ती खूप सक्रिय होती. ती अलीकडच्या काळात अनेक मोठ्या फॅशन इव्हेंट्समध्ये सहभागी झाली होती. Sonam Kapoor |
हेही वाचा:





