Entertainment । अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासाठी आजचा दिवस तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस असणार आहे. आज सोनाक्षी झहीर इक्बालची वधू बनणार आहे. त्यांच्या लग्नाचे गेल्या काही दिवसापासून विधी सुरु झाले आहे. मेहंदी आणि इतर प्री-वेडिंग फंक्शन्सनंतर हे जोडपे आज 23 जूनला लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
या जोडप्याचा सकाळी नोंदणीकृत विवाह होईल, त्यानंतर संध्याकाळी मोठा रिसेप्शन होईल. जिथे सोनाक्षी सर्वांसमोर नववधूच्या वेशात दिसणार आहे. प्रत्येक मुलीसाठी तिचा लग्नाचा पोशाख सर्वात खास असतो, सगळ्यांच्या नजरा तिच्या पोशाखावर असतात.
पण सोनाक्षी-झहीरच्या लग्नाआधीच त्यांच्या आउटफिट्सचा खुलासा झाला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोनाक्षीच्या घराबाहेरील रामायणाचा या बंगल्याच्या परिसरातील आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही लोक कारमधून लग्नाचे अनेक कपडे काढताना दिसत आहेत. यापैकी एक पीच रंगाचा लेहेंगा आहे, जो सोनाक्षीच्या लग्नाचा पोशाख असल्याचे म्हटले जात आहे.
खास दिवशी सोनाक्षी लाल रंगाचा लेहेंगा नाही तर पीच रंगाचा लेहेंगा घालणार आहे. इतकंच नाही तर सोशल मीडियावर कालचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आता सोनाक्षीच्या लग्नातील लुक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे.