पती झहीरसोबतचा एक व्हॅाट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॅाटच इन्स्टा स्टोरीला केला शेअर; प्रेग्नंसीच्या चर्चांवर सोनाक्षीने सोडलं मौन

Sonakshi Sinha : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नापासूनच नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. झहीर इक्बालसोबतची तिची केमिस्ट्री जुळली आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षी नेहमी तिचे आणि झहीरचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. आता सोनाक्षीच्या प्रेग्नंसीच्या चर्चांणा उधाण आले आहे. यावर स्वतः सोनाक्षीने मौनं सोडलं असून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सोनाक्षी सिन्हाने झहीरशी लग्न केल्यानंतर तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा होत आहे. मूळात झहीर इक्बालच्या रात्रीच्या उशिरापर्यंतच्या कामामुळे सोनाक्षी सिन्हाचे वजन वाढत आहे आणि तिच्या चाहत्यांचा असा गैरसमज झाला आहे की ती आई होणार आहे. याविषयी सोनाक्षीने तिचा पती झहीरसोबतचा एक व्हॅाट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॅाट इन्स्टा स्टोरीला शेअर केला आहे. झहीरसोबतच्या तिच्या संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर करत सोनाक्षी सिन्हाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “म्हणूनच लोकांना वाटते की मी गर्भवती आहे. यामुळे तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना आता तिनेच फुलस्टॅाप दिला आहे.
काय झालं संभाषण?
यामध्ये झहीर १२:१७ वाजता सोनाक्षीला विचारताना दिसतो की तूला भूक लागली आहे का? त्यानंतर सोनाक्षी सिन्हा उत्तर देते, “अजिबात नाही. मला खायला घालणे थांबवं.” असे ती रडणाऱ्या इमोजीसह झहीर लिहितो, “मला वाटले की मी हॉलिडे स्टार झालो आहे.” यानंतर अभिनेत्री म्हणते, “मी नुकतेच तुझ्यासमोर जेवण केले आहे. हे सर्व थांबवा.” यानंतर झहीर तिला लव्ह यू म्हणतो आणि ती देखील त्याला लव्ह यू मोअर असे म्हणत उत्तर देते.
हेही वाचा : टाटाचा ‘हा’ शेअर कोसळला ; गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण





