Purandar : ‘सोमेश्वर’चे संचालक धुमाळ यांचा सन्मान
Purandar : न्यू इंग्लिश स्कूल जेऊर व स्थानिक स्कूल कमिटीच्या वतीने सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

वाल्हे : शिक्षणाचा ज्ञानविस्तार झाल्यामुळे आज शिकलेल्या कर्तृत्ववान नेतृत्वाची नवी फळी घडत आहे. अभ्यासक्रम शिकवण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्त्व विकासाचे शिक्षण देण्याची खरी गरज आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेचे माजी उपाध्यक्ष व आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी जेऊर (ता. पुरंदर) येथे केले.
न्यू इंग्लिश स्कूल जेऊर व स्थानिक स्कूल कमिटीच्या वतीने सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांच्या संचालकपदी जेऊर येथील उत्तम धुमाळ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते यांनी केला. दरम्यान, कोलते यांनी आपल्या मनोगतात दिवंगत उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी निरा मार्केट कमिटीचे माजी सभापती शरद जगताप, आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे सहसचिव गौरव कोलते, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गायकवाड, नारायणपूरचे सरपंच प्रदिप बोरकर, उमेश थोपटे, माजी संचालक मोहन जगताप, माजी सरपंच जनार्दन तांबे, चंद्रकांत घुमाळ, प्रकाश चोरगे, दत्तात्रय धुमाळ, मनोहर घुमाळ, उध्दव धुमाळ, संतोष चोरगे, संजय सांगळे व अरविंद जगताप आदींसह ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते. माजी सरपंच प्रतिक धुमाळ यांनी आभार मानले.
‘को २६५’ ऊस जातीचे जतन करावे – विजय कोलते
या वेळी बोलताना विजय कोलते यांनी सांगितले की, कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष असताना आमच्या कार्यकाळात महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय, जास्त साखर उतारा देणारी आणि क्षारपड जमिनीतही उत्तम उत्पादन देणारी २६५ ही ऊसाची जात निर्माण करण्यात आली होती. ही ‘२६५’ व्हरायटी यापुढेही टिकली पाहिजे. तसेच शेतकऱ्यांचा ऊस वेळेत तोडून कारखान्यावर नेण्याची व्यवस्था संचालकांनी करावी,” अशी विनंतीही त्यांनी या वेळी केली.





