सोमेश्वरनगर -सोमेश्वर व वाणेवाडी (ता. बारामती) येथील दहावीच्या केंद्रावर मंगळवारी (दि. 3) विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सोमेश्वर विद्यालयातील परीक्षा केंद्रावर परिसरातील बा. सा. काकडे विद्यालय निंबूत, सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर, सोमेश्वर विद्यालय भाग शाळा करंजे, सोमेश्वर पब्लिक स्कूल, उत्कर्ष आश्रम शाळा वाघळवाडी आणि सोरटेवाडी विद्यालय या शाळांतील 437 विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
सकाळी परीक्षा सुरू होण्यापूर्वी बारामती पंचायत समितीच्या सदस्या नीता फरांदे व प्राचार्य एस. पी. जगताप यांच्या हस्ते मुलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या ठिकाणी एस. पी. जगताप, दीपाली ननावरे व अनिल साळुंखे केंद्र प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.
वाणेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गडदरवाडी विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल मुरूम, न्यू इंग्लिश स्कूल, चोपडज व न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी या चार विद्यालयतील 253 विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. पेपर सुरू होण्यापूर्वी बारामती तालुका राष्ट्रवादी युवकचे माजी अध्यक्ष विक्रम भोसले, योगेश भोसले, प्राचार्य विश्वास शितोळे यांच्या हस्ते मुलांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. केंद्र प्रमुख म्हणून आर. डी. चव्हाण काम पाहत आहेत.