मुंबई – नवी मुंबईमधील सागर विहार या भागात पादचारी पुलाचा काही भाग कोसळला आहे. या दुर्घटनेमध्ये दोन जण जखमी झाले असल्याची माहिती मिळाली असून, त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. थोड्याच दिवसा अगोदर मुंबईतील छ्त्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पादचारी पूल कोसळून झालेल्या अपघाता ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर या दुर्घटनेत ३२ जण जखमी झाले होते. त्यानंतर आज पुन्हा नवी मुंबईतील सागर विहार या भागात पादचारी पुलाचा काही भाग कोसळला आहे.
Maharashtra: Two people have been injured after a part of footover bridge in Sagar Vihar of Navi Mumbai's Vashi area collapsed this evening. They have been admitted to hospital. More details awaited. pic.twitter.com/aqYRZtIx6Y
— ANI (@ANI) April 11, 2019