Deepali Sayyed video : “या सरकारमध्ये प्रभू श्री रामांचे सैनिक”; अभिनेत्री दिपाली सय्यदचा व्हिडिओ चर्चेत
Deepali Sayyed : या व्हिडिओत त्यांनी आंदोलनाला घेऊन काही सवाल उपस्थित केले आहेत.

Deepali Sayyed : नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राजकारण चांगलचं तापलं असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. गेल्या एका महिन्यापासून दिल्लीत कॅाकरोच जनता पार्टीच्या वतीने विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा मुख्य उद्देश केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देणं हा आहे. या आंदोलनाला विद्यार्थ्यांवर २० जुलैच्या दिवशी पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जमुळे गालबोट लागलं. या भीषण परिस्थितीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावरुन समोर आल्यानंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या.
मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी विद्यार्थी आंदोलनाला समर्थन दिलं आहे. तर काही कलाकार समर्थन देत सरकारवर होत असलेल्या आरोपांची बाजू तर घेत नाहीत ना असा सवालही उपस्थित केला जात आहे. याच दरम्यान मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओत त्यांनी आंदोलनाला घेऊन काही सवाल उपस्थित केले आहेत.
दिपाली सय्यद व्हिडिओत काय म्हणाल्या?
“नमस्कार जय महाराष्ट्र. मी दिपाली सय्यद. नीट पेपर संदर्भात ज्या पद्धतीने आपल्या भारताचे भविष्य असलेले विद्यार्थी आंदोलन करतायेत, नक्कीच तो त्यांचा हक्क आहे. आपण ज्या भारत देशात राहतोय, त्या देशात लोकशाही आहे आणि व्यक्तिस्वातंत्र्य सुद्धा आहे. परंतु, व्यक्तिस्वातंत्र्यचा वापर कशापद्धतीने केला पाहिजे, याचा विशेष अधिकार आहे.” असं दिपाली यांनी म्हटलं आहे.
Space Food: अंतराळात नेण्यासाठी ‘या’ तीन भारतीय पदार्थांचीच झाली निवड; कारणही खास
व्हिडिओत विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीचा निषेध दिपाली यांनी नोंदवला. पण त्यांनी आंदोलनाला घेऊन त्यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. आपल्याकडे असलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या अधिकारामुळे आपण आपल्याच सरकारी मालमत्तेचं नुकसान तर करत नाही आहोत ना? कदाचित विरोधक या आंदोलनाला भडकावण्याचा प्रयत्न तर नाही ना करत? ज्या पद्धतीने बांग्लादेश आणि नेपाळमध्ये आंदोलन भडकलं होतं, तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न तर होत नाहीये ना? असे सवाल दिपाली सय्यद यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत.
View this post on Instagram
विद्यार्थ्यांच्या मागण्यांना सरकार नक्कीच सपोर्ट करेल
पण हे देखील लक्षात घ्यायला हवे की, हे जे सरकार आहे, ते सर्वसामान्यांचे सरकार आहे. या सरकारमध्ये प्रभू श्री रामांचे सैनिक आहेत, हे आपण विसरता कामा नये. शेवटी माझं एकच मत आहे. आपल्या भारताची संस्कृती ही वरिष्ठांची आदर करणारी आहे. ही मुलं आपल्या भारताचे भविष्य आहे. कृपया करुन कुठल्याही भडकावू विधानाला ताकद देऊ नका, असे आवाहनही दिपाली यांनी केलं आहे. मला खात्री आहे, विद्यार्थ्यांच्या मागण्यांना सरकार नक्कीच सपोर्ट करेल. त्यांना नक्कीच पाठबळ मिळेल. जय महाराष्ट्र… असेही दिपाली यांनी म्हटलं आहे.
Prahaar Release date: राजकुमार रावच्या ‘प्रहार’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली ?





