रखडलेले सौर प्रकल्प वेगाने मार्गी लावा
Updated On:

पुणे – पुढील काळ हा अपारंपारिक ऊर्जेचा आहे, याचे भान ठेवून अंमलबजावणीत रखडलेले सौर प्रकल्प वेगाने मार्गी लावणे गरजेचे आहे. तसेच या क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून टप्प्याटप्प्याने भावी काळातील सुमारे 2700 मेगावॉट क्षमतेचे सौरप्रकल्प गतीने पूर्ण करावेत, अशा सूचना उर्जामंत्री डॉ. नितिन राऊत यांनी दिल्या.
अपारंपारिक उर्जेचे नियोजन प्रभावीपणे करण्यासाठी महानिर्मिती कंपनी अंतर्गत सौरऊर्जेसाठी एक उपकंपनी स्थापन केल्यास उत्तरदायित्व निश्चित करून विहित वेळेत सौरऊर्जा क्षमता वाढ शक्य होईल.
महानिर्मितीकडे सध्या उपलब्ध मोकळ्या जमिनींचा पर्यावरण पूरक छोटे छोटे सौरप्रकल्प उभारणीसाठी कसा उपयोग होऊ शकेल याचीही व्यवहार्यता तपासण्याचे आदेश डॉ. राऊत यांनी दिले.




