प्रभात वृत्तसेवा बारामती – महावितरणने विजेची वाढती हानी रोखण्यासाठी कठोर पाऊले उचलली आहेत. बारामती परिमंडळात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत वीजचोरीविरूध्द मोहिम राबवून 1443 जणांवर कारवाई केली आहे. या प्रकरणात 4 कोटी 23 लाख रूपये दंड आकारण्यात आला आहे. वीज चोरीचे प्रमाण आणि दंडाची रक्कम ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. वीजचोरीप्रकरणी बारामती मंडळात 239 जणांवर कारवाई करून 1 कोटी 11 लाख रूपये दंड आकारला आहे.मीटरमध्ये छेडछाड वा फेरफार करणे, विजेच्या वाहिन्यांवर आकडे टाकणे, अनधिकृत वीज वापर करणे इ.प्रकारे वीजचोरी आढळून आली. भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 व 136 अन्वये कारवाई केली आहे. वीज ग्राहकांनी क्षणिक आर्थिक लाभासाठी गैरप्रकाराचा अवलंब करू नये केवळ अधिकृत वीजवापर करावा, असे महावितरणचे आवाहन आहे. वीजचोरीप्रकरणी बारामती मंडळात 239 जणांवर कारवाई करून 1 कोटी 11 लाख रूपये दंड, सातारा मंडळात 294 जणांवर कारवाई करून 63 लाख 55 हजार रूपये दंड तर सोलापूर मंडळात 910 जणांवर कारवाई करून 2 कोटी 48 लाख रूपये दंड आकारण्यात आला आहे. विभाग निहाय वीजचोरीप्रकरणी कारवाई आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. बारामती मंडळातील बारामती विभागात 84 प्रकरणी 16 लाख 45 हजार रूपये, केडगाव विभागात 149 प्रकरणी 85 लाख 28 हजार रूपये तर सासवड विभागात 6 प्रकरणी 10 लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे. सातारा मंडळातील कराड विभागात 69 प्रकरणी 23 लाख 22 हजार रूपये, फलटण विभागात 68 प्रकरणी 4 लाख 31 हजार रूपये, सातारा विभागात 60 प्रकरणी 7 लाख 96 हजार रूपये, वडूज विभागात 68 प्रकरणी 22 लाख 18 हजार रूपये तर वाई विभागात 29 प्रकरणी 5 लाख 88 हजार रुपये दंड आकारला आहे. सोलापूर मंडळातील अकलूज विभागात 96 प्रकरणी 56 लाख 75 हजार रूपये, बार्शाी विभागात 222 प्रकरणी 50 लाख 23 हजार रूपये, पंढरपूर विभागात 357 प्रकरणी 64 लाख 68 हजार रूपये, सोलापूर ग्रामीण विभागात 110 प्रकरणी 15 लक्ष 98 हजार रूपये तर सोलापूर शहर विभागात 125 प्रकरणी 60 लाख 84 हजार रुपये दंड आकारला आहे.