सोलापूरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शितलकुमार जाधव निलंबित, मंत्री तानाजी सावंत यांची घोषणा

सोलापूर – सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शितलकुमार जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नागपूर येथील विधान परिषद अधिवेशनात घोषणा केली आहे. जिल्ह्यात लोकसंख्या व अंतराच्या निकषानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यांची किती आवश्यकता आहे. याचा परिपूर्ण आराखडा सादर न केल्यामुळे निलंबीत करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रशासनाकडून वारंवार पत्र देउन प्रस्ताव मागवून देखील प्रस्ताव सादर न केल्यामुळे सावंत यांनी निलंबन कारवाईची घोषणा केली आहे.
डॉ. शितलकुमार जाधव हे सोलापूर येथे सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कृष्ठरोग) कार्यरत होते, मात्र कोरोनाच्या काळात त्यांच्याकडे सोलापूर शहर आरोग्य अधिकारीपदाची सुत्रे देण्यात आली होती. दरम्यान, त्यांनी केलेल्या विनंतीनुसार सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी पदी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचा शासन निर्णय 29 सप्टेंबर 2020 रोजी प्राप्त झाला होता. त्यानुसार ते आजपर्यंत काम पाहत होते. दरम्यान, त्यांच्यावर आता निलबंनाची कारवाई करण्यात आली आहे.




