सोलापूर- सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना एक दिलासादायक बाब समोर आली आहे.एकाच दिवसात चक्क 31 कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात तणाव कमी होण्याची शक्यता दिसत आहे.
सोलापुरात आज 2 रुग्णांचे अहवाल पाॅसिटीव्ह आले आहेत तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत नाही आहे.
दरम्यान, सोलापुरात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा277 तर गेला आहे तर आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे.