Sohla Movie Trailer : सोनाली बेंद्रेचे मराठी सिनेमात पदार्पण; चाहत्यांमध्ये उत्सुकता
Sohla Movie Trailer : 'सोहळा' हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

Sohla Movie Trailer: बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे एक नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. ‘सोहळा’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
सोनाली बेंद्रे या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मराठी चित्रपट प्रेझेंटर म्हणून काम करत आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल सिनेरसिकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. नाती, भावनिक बंध आणि बालपणीच्या निरागस आठवणींचा मेळ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
सिनेमाच्या ट्रेलरमध्ये एका गावात राहणाऱ्या लहान मुलाची आणि त्याच्या कुटुंबाची एक संवेदनशील आणि भावनिक गोष्ट पाहायला मिळते. अचानक उद्भवलेल्या एका संकटामुळे आणि परिस्थितीमुळं त्याच्या आयुष्याला मिळणारं वळण आणि त्यातून होणारा त्याचा कौटुंबिक प्रवास ट्रेलरमध्ये अतिशय भावनिक पद्धतीनं रेखाटण्यात आला आहे.
View this post on Instagram
‘सोहळा’ सिनेमाचे दिग्दर्शन साईकत बागबान यांनी केले असून, निर्मिती गोल्डी बहलसह सचिन श्रीवास्तव, रत्ना श्रीवास्तव व कविता बागबान यांनी केली आहे; तर सिनेमाची प्रेझेंटर अर्था प्रस्तुतकर्ती म्हणून सोनाली बेंद्रे काम करणार आहे.
‘सोहळा’ हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात एका १३ वर्षांच्या बालकलाकारासह काही दिग्गज मराठी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
मी सोहळामध्ये अभिनेत्री म्हणून प्रस्तुतकर्ती नाही, तर या चित्रपटावर आणि कथेवर विश्वास असलेली व्यक्ती म्हणून त्याला प्रेक्षकांसमोर घेऊन येत असल्याची प्रतिक्रिया देखील सोनालीने दिली. सोहळा या सिनेमासाठी सोनाली बेंद्रे देखील खूप उत्सुक आहे.
हेही वाचा:





