दादा कोंडके यांच्या चित्रपटांतून सामाजिक चळवळ – सुरेश काळे

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 20 – दादा कोंडके यांचे चित्रपट म्हणजे सामाजिक चळवळ असायची. त्यामाध्यमातून समाजाला
एक सामाजिक संदेश असायचा,असे प्रतिपादन ग्रामोपाध्याय सुरेश काळे यांनी केले.
चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, विनोदवीर तथा दिग्गज अभिनेते स्व. शाहीर दादा कोंडके यांचा 91 वा जन्मदिन साजरा करण्यात आला. दादा कोंडके यांचा जन्म मुंबई येथे 1932 साली श्रीकृष्ण जन्माष्टमीला झाला. दि.14 मार्च 1998 साली दादा कोंडके यांचा मृत्यूनंतर गेल्या 24 वर्षांपासून दरवर्षी शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठान, दादा कोंडके मित्र परिवार आणि दादा कोंडके ग्रुप प्रॉडक्शन्स हे जन्माष्टमीला त्यांची जयंती साजरी करत आहेत.
यावेळी प्रतिष्ठानचे सल्लागार विक्रम जाधव, फिल्म क्राफ्ट फेडरेशन संचालक पत्रकार जितेंद्र गोळे, शिवांशशक्ती फाउंडेशनचे सूरज सुर्यवंशी, डॉ. राजेंद्र भवालकर, उद्योजक बाळासाहेब दुर्गे, अंकुश ढवळे, लेखक सतीश काळे, अभिनेते प्रशांत महाजन, दिग्दर्शक अर्पित इंगळे, प्रफुल्ल धर्माधिकारी,
अमित माझिरे, विजय उत्तेकर आदी मान्यवर उपस्थित होते.



