सोशल मीडियावर ‘रॅाकी’ची हवा! शेतीकामासाठी मालकाला लावतोय हातभार, व्हिडिओ व्हायरल; तुम्ही म्हणाल क्या बात है!

हिंगोली : आजवर तुम्ही शेतात बैलांना राबताना पाहिलं आहे, पण कधी श्वानाने शेतकऱ्याला मदत केल्याचे पाहिले आहे का? पण ही गोष्ट घडली आहे, हिंगोली जिल्ह्यातील पांगरा गावात. येथील एका शेतकऱ्याला शेतीकामासाठी चक्क त्याच्या श्वानाने मदत केली आहे.
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा या गावातील शेतकरी दत्तराव ग्यानबाराव शिंदे यांचा रॅाकी नावाचा पाळीव श्वान आहे. रॉकीने आपल्या मालकाला चक्क शेतामध्ये काम करायला मदत केली आहे.
रॉकी नावाच्या श्वानाने तब्बल अर्धा एकर हळद लावलेल्या शेतातील बेडवर ठिबक आंथरले आहे, सोशल मीडियार रॅाकी आणि त्याच्या शेतकरी मालकाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर रॅाकीची हवा पाहायला मिळत आहे.
बैल म्हणजे शेतकऱ्यांचे सोबती. शेतीच्या कामासांठी बळीराजाला बैलांची मोठी मदत भासते. ऊन वारा वादळ या नैसर्गिक आपत्तींशी सामना करत त्याचे सौबती शेतात राबत असतात. रॅाकी हा श्वान आपल्या शेतकरी मालकाला शेतीमध्ये मदत करत आहे. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
https://www.facebook.com/share/r/16UyFhFgQZ/





