मांडवगण फराटा – इनामगाव (ता. शिरूर) येथे श्री वसंतराव फराटे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व लोकनेते श्री दादा पाटील फराटे फार्मसी कॉलेज मांडवगण फराटा यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत मोबाइलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम या विषयावर पटनाट्याच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवकांनी समाज प्रबोधन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी इनामगाव येथे रॅली काढून मोबाइलचा अतिवापर धोकादायक आहे का? याबाबत पथनाट्य सादर केले. पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी संदेश देताना माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संवादाची प्रभावी माध्यम स्मार्टफोन उपयोगी पडतोय. सगळ्याच गोष्टी आता स्मार्टफोनवर ‘अपलोड’ होऊ लागल्या आहेत. परंतु स्मार्टफोन तंत्रज्ञानाचा अतिवापर आरोग्याला मारक ठरत असल्याचा संदेश दिला.
पथनाट्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव फराटे पाटील, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर फराटे पाटील, सचिव मृणाल फराटे पाटील, प्राचार्य डॉ. तुकाराम सावंत. प्राचार्य डॉ. हेमंत कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. जयराम पवार, प्रा. सुरेखा देशमुख. प्रा. अविनाश ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते.