Shefali Shah : बॅालिवूड इंडस्ट्रीत आठ तासांच्या कामाच्या शिफ्टबद्दल अनेक अभिनेत्री आपली मतं मांडताना दिसत आहेत. नुकतेच एका मुलाखतीवेळी अभिनेत्री शेफाली शाह हिने देखील याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. सध्या शेफाली तिच्या आगामी दिल्ली क्राइम सीझन ३ या वेबसिरीजमुळे चर्चेत आहे. तिने सिरीजच्या प्रमोशनवेळी दिलेल्या मुलाखतीत आठ तासांच्या शिफ्टबद्दल मत मांडत पुरुष कलाकारांच्या सेटवर उशिरा येण्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. आम्ही हुशार लोक आहोत, म्हणून जर उद्या जागा उपलब्ध नसेल किंवा आत्ताच काही करायचे असेल तर आम्हाला समजते. पण हे सर्वसामान्य प्रमाण असू शकत नाही. असे मत शेफालीने व्यक्त केले. पुढे ती म्हणाली, मला सेटवर जाण्यासाठी दीड तास लागतो आणि परत येण्यासाठीही तेवढाच वेळ लागतो. सेटवरील हे तास माझ्या लक्ष्यात असतात. मी घरी जाते आणि जिमला जाण्याची आशा करते, कारण तो माझ्या कामाचा एक भाग आहे. सगळे कामे पूर्ण झाल्यावर झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठावे लागत असल्याने मला किती तास झोप मिळते? असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे. त्यामुळे तुम्ही माझ्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा कशी करू शकता असे देखील ती म्हणाली. शेफालीने पुढे बोलताना स्पष्ट केले की, जास्त कामाचे तास केवळ कलाकारांनाच त्रास देत नाहीत तर क्रूलाही त्रास देतात. मी शूट केलेल्या मागील चित्रपटांपैकी एक, ज्यामध्ये १० तासांचे वेळापत्रक होते, असे सांगत क्रूला ओव्हरटाईमसाठी अतिरिक्त पैसे मिळत नाहीत. असा मोठा खुलासा तिने केला. आम्ही महिला कलाकार करारानुसार आठ तास आणि १० तासांच्या शिफ्टवर बोलतो. पण मग शूटिंगसाठी उशिरा येणाऱ्या पुरुष कलाकार किती वेळाने सेटवर पोहचतात ते किती तास उशिरा येतात याच कधी विचार केला आहे का? असा सवाल तिने उपस्थित केला आहे. हेही वाचा : कतरिनाने दिली गुडन्यूज! विकी कौशलच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, पोस्ट शेअर करत म्हणाला…