पुणे जिल्हा | …तर विरोधकांच्या पोटात का दुखते

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण ही संकल्पना विधानसभा सभागृहात मांडली. त्यावेळी कोणीही विरोध केला नाही मात्रनंतर बाहेर येऊन विरोधकांनी टीका टिपण्णी केली.
शासन लोकांना निष्क्रिय बनवत आहे अशी टीका होत आहे. मात्र, शासन राज्यातील महिलांना महिना दीड हजार रुपये देत आहे. सरकार मदत करीत असेल तर विरोधकांच्या पोटात का दुखते असा सवाल आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत तालुक्यातील सर्व शासकीय विभागाच्या वतीने राजगुरूनगर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखा मोहिते पाटील, अरुण चांभारे, मंगल चांभारे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राम गावडे,
तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष कैलास सांडभोर, भाजप तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांढवे, तहसीलदार ज्योती देवरे, नायब तहसीलदार मदन जोगदंड, राम बीजे, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, महिला बालकल्याण अनिकेत पालकर, भाजप समन्वयक गणेश सांडभोर, कल्पना गवारी, विनायक घुमटकर, विठ्ठल वनघरे, नीलेश थिगळे, जयसिंग दरेकर, दीप्ती कुलकर्णी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
खेड तालुक्यात 35 वर्षांत कोट्यवधी रुपये विकासासाठी आणले. पूल, बंधारे,रस्ते झाले. कोट्यवधी रुपयांची प्रत्यक्ष कामे सुरू आहेत. तरीही विरोधक म्हणतात आमदारांनी काय काम केले? वास्तविक त्यांना आमदारकीची स्वप्न पडत आहेत अशी अज्ञानी माणसे माझ्यावर टीका करत आहेत. अजित पवार यांनी तालुक्याच्या विकासाला कोट्यवधी रुपये दिले. तालुका विकासात पुढे नेला .चास कमान, कळमोडी सुप्रमा काढली.
तालुक्याची ओळख असलेल्या हुतात्मा राजगुरू स्मारकाला 254 कोटींरुपयांचा निधी मंजूर केला 104 कोटी रुपये वर्ग झाल्याने येथील संपादन काम सुरू झाले आहे. चाकण नव्याने हॉस्पिटल 94 कोटी रुपये निधी मिळाला. जो अपल्या करता करतो, त्याच्या करता आपण काहीतरी करावे.
उद्या सत्ता बदलली तर माझी लाडकी बहिण योजना विरोधक बंद करतील म्हणून महिलांनी याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बाई पण देगा देवाहा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम तालुक्यात सर्वत्र राबिवण्यात येणार आहे. सूत्रसंचालन पल्लवी रामाणे यांनी केले.
आम्ही सहकार्य करू
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत खेड तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळेल असे काम करावे, याची अधिका-यांनी दक्षता घ्यावी. यात काही उणीवा असतील तर आम्ही सहकार्य करू, असे आश्वासन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिले.
अरे संसार संसार या गण्याप्रमाणे तिचे चटके दूर करणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना आहे. खेड तालुक्यात 20हजार महिलांची नोंदणी केली आहे 80 हजार महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा आहे. त्यासाठी गावागावांत काम केले जाईल. महिला योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल तालुक्यात एक लाख महिला लाभार्थी होतील. – ज्योती देवरे, तहसीलदार





