Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी काल 24 फेब्रुवारी रोजी मुंबईत एसी लोकलमधून प्रवास केला. निर्मला सीतारमन यांनी घाटकोपर ते कल्याणपर्यंत लोकलने प्रवास केला. यावेळी त्यांनी प्रवाशांसोबत देखील संवाद साधला. निर्मला सीतारमन यांना लोकलमधून प्रवास करताना पाहून प्रवासी देखील चकित झाले होते. निर्मला सीतारमन यांचा व्हिडिओ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
लोकलमधून प्रवास करताना सीतारमन यांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांच्या प्रश्नांचे निरसन केले. यादरम्यान काही प्रवाशांना त्यांच्यासह फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. सध्या त्यांचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. दरम्यान, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उद्घाटनानंतर अनेक ट्रेन आणि मेट्रोमधून प्रवास करताना दिसले होते.
इसलिए चाहिये
तीसरी बार मोदी सरकार, वो भी 400 पार
देश की मा. केंद्रीय मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन जी ने मुंबई की लोकल में सफ़र किया और आम लोगो से संवाद किया।आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व वाली सरकार में प्रत्येक नेता जनसेवक के रूप में देश के अंतिम… pic.twitter.com/cRppPbeUXP
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 24, 2024
देवेंद्र फडणवीस ट्वीट
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्मला सीतारमन यांचा व्हिडिओ ट्विट केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “यासाठी हवे आहे… देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार. निवडणुकीत एनडीएला 400 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळणार आहे. देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मुंबई लोकलमधून प्रवास केला. त्यांना सर्वसामान्य लोकांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात येणाऱ्या सरकारमध्ये प्रत्येक नेता जनसेवक असतो. देशातील अंतिम व्यक्तीच्या जीवनात बदल आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. “