Gulabrao Patil : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला वेग आला असून, भाजपने तर निवडणुकीसाठी जिल्ह्यानुसार प्रभारींची नियुक्ती केली आहे. या प्रभारींवर निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिवसेनेदेखील या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी कंबर कसली आहे. या राजकीय घडामोडीत सत्ताधाऱ्यांतर तुटून पडणारे उबाठाचे नेते खासदार संजय राऊत हे प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात भरती झाले आहेत. पुढचे दोन महिने ते सार्वजनिक जीवनापासून लांब राहणार असल्याचे त्यांनी स्वतः जाहीर केलेले आहे. अशातच शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी बुलाढाण्यात येथील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना यावर भाष्य करत, बघा ना माझा संजय राऊत कसा ऍडमिट आहे. काय सांगावं तुम्हाला. वो मेरा माल है भाई, माल है. ते वाचलं पाहिजे. असे पाटील म्हणाले आहेत. तसेच त्यांनी आमदार संजय गायकवाड यांचा उल्लेख डॅान असा केला. यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर तुफान फटकेबाजी केली. त्यांच्या भाषणबाजीची सध्या जोरदार चर्चा केली जात आहे. या भाषणात गुलाबराव पाटील यांनी शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला दिलेली संधी यावर देखील भाष्य केले. पुढे बोलताना त्यांनी बताओ कलेक्टर बडा है या गुलाबराव पाटील बडा है? हम जीआर भी निकालते है और तुम्हारा सीआर भी निकालते है, असे विधान त्यांनी आपल्या भाषणात केले. या विधानाची देखील मोठी चर्चा राज्याच्या राजकारणात होत आहे. संजय राऊत यांच्याविषयी नेमकं काय म्हणाले? बघा ना माझा संजय राऊत कसा ऍडमिट आहे. काय सांगावं तुम्हाला. वो मेरा माल है भाई, माल है. ते वाचलं पाहिजे. मी देवाला प्रार्थना केली की त्याला सद्बुद्धी दे. सत्यानाश करणाऱ्या लोकांना देवाने चांगली बुद्धी दिली तर उद्धव ठाकरेंसोबत जे 20 लोकं आहेत ते टिकून राहतील, असा टोला गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. संजय गायकवाडांचा डॅान म्हणून उल्लेख आमचे संजय गायकवाड बघा कसे आहेत डॉन. आम्हाला गुंडा म्हणतात. अरे शंड असण्यापेक्षा गुंडा असलेला कधीही बरं. अरे पुत्र हो ऐसा ज्याच्या हाती हो भगवा झेंडा. जो फोडे उबाठा वाल्यांचा भ्रष्टाचारी हंडा, असेही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. हेही वाचा : “इतका सुंदर क्षण माझ्या आयुष्यात आला…”; पूजा सावंतने सांगितला अभिनेत्री तब्बू सोबतच्या भेटीचा अनुभव