‘…तर राजकीय नेते पाणीपुरी विकणार काय?’ शंकराचार्यांच्या वक्तव्यावर कंगना संतापली

ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरून त्यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ येथे मुंबईत भेट दिली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला. आम्ही हिंदू धर्माचे पालन करतो आणि ‘पुण्य’ आणि ‘पाप’ मानतो. विश्वासघात हे सर्वात मोठे पाप मानले जाते, आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत हेच घडले आहे. ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय त्यांच्या वेदना कमी होणार नाही, असेही ते म्हणाले.
राजनीति में गठबंधन , संधि और एक पार्टी का विभाजन होना बहुत सामान्य और संवैधानिक बात है, कांग्रेस पार्टी का विभाजन 1907 में और फिर 1971 में हुआ, अगर राजनीति में राजनीतज्ञ राजनीति नहीं करेगा तो क्या गोलगप्पे बेचेगा?
शंकराचार्य जी ने उनकी शब्दावली और अपने प्रभाव और धार्मिक शिक्षा… https://t.co/UV2KuLwVUz— Kangana Ranaut (@KanganaTeam) July 17, 2024
अशात महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काही जण त्यांच्यावर टीका करत आहेत तर काही जण त्यांचे समर्थन करत आहेत. त्याचवेळी आता बॉलिवूड क्वीन आणि भाजप नेत्या कंगना राणावतनेही या मुद्द्यावर वक्तव्य केलं आहे.
कंगना राणावत शंकराचार्यावर संतापली
हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातील लोकसभा खासदार कंगना राणावतने शंकराचार्यावर निशाणा साधला आहे. तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पाठिंबा दिला आहे. कंगनाने सांगितले की, अविमुक्तेश्वरानंद यांनी शिंदेंना देशद्रोही आणि विश्वासघातकी म्हणून सगळ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. राजकारणात हे सर्व होत असतं. काँग्रेस पक्ष देखील १९०७ आणि १९७१ मध्ये फुटला होता.’
कंगनाने X वर एक पोस्ट शेअर करत लिहिले, ‘राजकारणामध्ये आघाडी, युती, पक्षाचे विभाजन अशा घटना होणे सामान्य आणि संविधानिक आहे. हे सर्व राजकारणाचा एक भाग आहे. राजकारण्यांनी राजकारण करायचं नाही तर का मग पाणीपुरी विकायची का? असा थेट सवाल तिने शंकराचार्यांना विचारला आहे. दरम्यान तिच्या विधानामुळे नव्या वाद होण्याची शक्यता आहे. तिच्या या विधानावरून राजकीय नेते नेमकी काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





