…म्हणून मी राहुल गांधींना ‘अमूल बेबी’ म्हणालो होतो : केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांचा उलगडा

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते तथा केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांनी आज आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांनी काही वर्षांपूर्वी राहुल गांधी यांच्यावर उपहासात्मक टीका करताना त्यांचा उल्लेख ‘अमूल बेबी’ असा केला होता. अच्युतानंदन यांनी आज केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये आपण राहुल गांधींना ‘अमूल बेबी’ म्हणून का संबोधले होते याचा उलगडा करताना केरळमधून निवडणूक लढविण्याच्या राहुल गांधी यांच्या निर्णयावर टीका केली आहे.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणतात, “मी राहुल गांधी यांचा उल्लेख ‘अमूल बेबी’ असा केला होता, आताचे त्यांचे राजकीय निर्णय पहिले तर त्यांनी मी दिलेली ‘अमूल बेबी’ ही उपाधी आजदेखील तंतोतंत लागू पडते. मुळात राहुल गांधी यांच्याकडे कोणत्या वेळी कोणते निर्णय घ्यावे याबाबत समज नाहीये. आता हेच पहा राहुल गांधी हे वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत. यामुळे काय होईल? डावे पक्ष आता काँग्रेस आणि भाजप या दोघांचाही सामना करतील. मात्र राहुल गांधींच्या या निर्णयामुळे काँग्रेसचा आपला मुख्य विरोधक भाजप असल्याच्या दाव्याला तडा जाणार आहे.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.