….म्हणून पाकिस्तानला कोरोना लस देण्यास कंपन्यांचा नकार ;परिस्थिती गंभीर

मुंबई : कोरोनाशी लढण्यासाठी भारत देश आज एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अखेर संपूर्ण देशात कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. दरम्यान आपल्या देशात हे सर्व सुरु असताना आपला शेजारी देश असणाऱ्या पाकिस्तानात परिस्थिती उलट आहे. त्याठिकाणी अद्याप लशीची उपलब्धता नाही आहे. शिवाय कोणतीही कंपनी पाकिस्तानला लस देण्यास तयार नाही आहे.

एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, जगातील अनेक देशांनी कोरोनाशी लढण्यासाठी व्हॅक्सिनेशन सुरू केले आहे मात्र पाकिस्तानने अद्याप लशीचा बंदोबस्त केला नाही आहे. कोव्हिड-19 लस मागवण्यासाठी पाकिस्तानने अद्याप कोणतीही अंतिम ऑर्डर देखील दिली नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. तसंच कोणत्याही व्हॅक्सिन मॅन्यूफॅक्चररने व्हॅक्सिन पुरवण्यासाठी पाकिस्तानला मंजुरी दिली नाही आहे.

या अहवालात असे नमुद करण्यात आले आहे की, पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सचिव डॉ. फैजल खान यांनी न्यूज इंटरनॅशनलशी बोलताना अशी माहिती दिली आहे की, ‘आम्ही फ्रंटलाइन वर्कर्स आणि इतर लोकांना लवकरात लवकर व्हॅक्सिनची पहिली बॅच मिळावी याकरता पूर्ण प्रयत्न करत आहोत. मात्र अद्याप अंतिम ऑर्डर देण्यात आली नाही आहे.’

पाकिस्तानकडून चीनच्या सिनफार्मा कंपनीबरोबर व्हॅक्सिनबाबत चर्चा सुरू असल्याचे स्थानिक वृत्तपत्रात सांगण्यात आले आहे. मात्र अद्याप त्यावरही अंतिम निर्णय घेण्यात आला नाही आहे. डॉ. फैसल खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कॅन्सिनो या दुसऱ्या व्हॅक्सिनवरही ट्रायल सुरू आहे आणि ते त्यांचा डेटा काही आठवड्यात देतील. रशियन व्हॅक्सिन Sputnik V बाबत देखील आमचा विचार सुरू आहे, त्यांनी काही डेटा जमा केला आहे.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.