पिंपरी | तुलसानीया विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात
Updated On:

कामशेत, (वार्ताहर) – कामशेत येथील तुलसानीया विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. प्राथमिक व माध्यमिक विभाग यांचा कार्यक्रम दोन दिवस सादर करण्यात आला होता.
यंदाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात राज्यातील विविधतेत एकता या विषयावर आधारित सांस्कृतिक परंपरा, प्रदेशानुसार वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी गीतांचे अतिशय उत्तम प्रकारे सादरीकरण केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे संगणक अभियांत्रिकी विभागाच्या अंजली मोरे व प्रमुख पाहुणे म्हणून कामशेत पोलीस स्टेशनचे रवींद्र पाटील हे उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रद्धा चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या सांस्कृतिक कार्यक्रमात संगीत, नृत्य अनेक मनोरंजन कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





